Monday, December 23, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर : भरधाव कारच्या अपघातात 5 विद्यार्थी जखमी

कोल्हापूर : भरधाव कारच्या अपघातात 5 विद्यार्थी जखमी

शाळेला निघालेल्या पाच विद्यार्थ्यांना भरधाव कारने उडविल्याने ते जखमी झाल्याची घटना हसूर दुमाला (ता. करवीर) येथे सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.

विश्‍वजित केरबा पाटील (वय 16), ओंकार तानाजी पाटील (16, दोघे रा. हिरवडे खालसा), उत्कर्ष उत्तम खरोसे (15), तेजस तानाजी पाटील (16), साईराज काशीनाथ पाटील (16), युवराज विठ्ठल पाटील (36, चौघे रा. भाटणवाडी, ता. करवीर) अशी जखमींची नावे आहेत.

सर्व विद्यार्थी आपापल्या गावांकडून हसूर दुमाला येथे शाळेला पायी चालले होते. यावेळी राधानगरीकडे निघालेल्या भरधाव कारने या विद्यार्थ्यांना मागून जोराची धडक दिली. हे विद्यार्थी कारसोबत फरफटत गेले. अपघाताची माहिती समजताच घटनास्थळी पालक, ग्रामस्थांनी धाव घेतली.

जखमी विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.प्राथमिक उपचारांनंतर सर्वांना एका खासगी हॉस्पिटलमध्ये तपासून घरी सोडण्यात आले. या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. वाहने भरधाव वेगाने जात असतात. याबाबत पालकांनी वेळोवेळी तक्रार करूनही यंत्रणेने दुर्लक्ष केल्यामुळेच अपघात झाला. या घटनेची नोंद करवीर पोलिसांत झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -