Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगविद्यार्थ्यांना भडकवणाऱ्या हिंदुस्थानी भाऊला मुंबई पोलीसांनी उचलले

विद्यार्थ्यांना भडकवणाऱ्या हिंदुस्थानी भाऊला मुंबई पोलीसांनी उचलले

राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावीतील निवासस्थाबाहेर करण्यात आलेल्या आंदोलनाप्रकरणी प्रसिद्ध युट्यूबर आणि बिग बॉस 13 मधील स्पर्धक विकास जयराम पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊ (41) याच्यासह इकरार खान वखार खान मुस्लिम (25) याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धारावी पोलीस ठाण्यात याप्रकरणी भादंवी कलम 353, 332, 427, 109, 114, 143, 145, 146, 149, 188, 269, 270 यासह आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम 51(ब) आणि जमाव बंदी आदेश भंग केल्याप्रकरणी कलम 37 (३), 135, महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम 3 अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे.

इन्स्टाग्राम आणि फेसबुक या सोशल मीडिया माध्यमांवर ‘हिंदुस्थानी भाऊ’ या नावाने प्रोफाईल असलेल्या पेजवर 10 आणि 12 वी परीक्षार्थीं विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय. परीक्षा ऑनलाईन घ्या अन्यथा रद्द करा अशी मागणी करणारा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. व्हिडीओच्या माध्यमातून 31 जानेवारी रोजी आंदोलनासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन केले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -