सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी भुकंपाचे धक्के बसले. आज (दि.१) मंगळवारी सकाळी ९.४७ वाजता ३.३ रिश्टर स्केलचा भूकंप कोयना धरण परिसरात झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू धरणापासून ९.६ किलोमीटर अंतरावर काडोली गावच्या पश्चिमेस ७ किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती कोयना भूकंप मापन केंद्रावरून देण्यात आली.
मंगळवारी सकाळी ९.४७ वाजता हा ३.३ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपामुळे कोयना धरणाला कोणताही धोका पोहोचला नसल्याची माहिती धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली.