व्हॉट्स अॅप भारतासह अनेक देशांमध्ये सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अॅप आहे. या माध्यमातून लोक माहितीची देवाणघेवाण करतात. याचबरोबर अनेक खासगी गोष्टीही शेअर केल्या जातात, त्यामुळे तुमचे व्हॉट्स अॅप खाते सुरक्षित असणे गरजेचे आहे. अलीकडे अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये व्हॉट्स अॅप अकाउंट हॅक झाल्याचे सांगण्यात आले आहे. जर तुम्हाला तुमचे व्हॉट्स अॅप खाते सुरक्षित ठेवायचे असेल आणि हॅकिंग रोखायचे असेल तर तुम्ही या टिप्स फॉलो करू शकता.
तुमच्या खात्यावर पाठवली जाणारी कोणतीही अनोळखी लिंक उघडू नका. कोणतीही लिंक “https”ने सुरू होत असेल तरच लिंकवर क्लिक करा. लिंक सुरक्षित आहे का हे तपासण्यासाठी, तुम्ही गूगल वरील वेगवेगळे अहवाल पाहू शकता. तसेच कोणतेही थर्ड पार्टी अॅप डाऊनलोड करू नका.
या फीचरमुळे तुमचे व्हॉट्स अॅप अकाऊंट अधिक सुरक्षित होते. टू-स्टेप व्हेरिफिकेशन करण्यासाठी, सर्वप्रथम व्हॉट्स अॅप उघडा, मग सेटिंग्ज वर क्लिक करून अकाउंट्स वर जा. मग टू-स्टेप व्हेरिफिकेशन वर क्लिक करा आणि तूम्हाला हवा असणारा चार अंकी पासवर्ड टाका. त्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल अॅड्रेस टाकवा लागतो. आता तुमच्या परवानगीशिवाय कोणीही तुमचे व्हॉट्सअॅप खाते उघडू शकणार नाही.
व्हॉट्स अॅप वापरकर्त्यांना अनेक गोपनीयतेचे पर्याय उपलब्ध आहेत. तूम्ही तूमचेे प्रोफाइल फोटो, अबाउट आणि स्टेटस कोणकोण पाहू शकते, हे स्वतः ठरवू शकता. हि सेटिंग अनेबल केल्याने इतर कोणीही तूमचेे प्रोफाइल फोटो, अबाउट आणि स्टेटस पाहू शकणार नाही.