Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रअटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या अंगावर घातली संशयिताने गाडी

अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या अंगावर घातली संशयिताने गाडी

फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या रत्नागिरी शहर पोलिसांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे यांच्या अंगावर संशयिताने गाडी घातली. दरम्यान, त्यांना चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या संतोष जगदाळे (रा. सासवड, पुणे) याला शिताफीने अटक करण्यात आले. हल्ला केल्यानंतर १३० किलोमीटर पाठलाग करून थरारक पद्धतीने शहर पोलिसांच्या पथकाने संतोष जगदाळेला ताब्यात घेतले.

गेली वर्षभर तो पोलिसांना चकवा देत होता. त्याच्याविरोधात सातारा जिल्ह्यातील शिरवळ पोलीस स्थानकात ३०७ नुसार हत्येचा प्रयत्न करण्यासह शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शिरवळ (सातारा) पोलिसांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -