सातपूर औद्योगिक वसाहती मधील कॅपॅसिटरचे उत्पादन करणारी निलराज इंडस्ट्रीज या कंपनीला भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही.
दि. २ फेब्रुवारी बुधवार रोजी पहाटे ५ ते ५:३० वाजेच्या दरम्यान कंपनीला आग लागली. कंपनीत प्लास्टिक आणि ॲल्युमिनियम असल्याने थोड्याच वेळात आगीने रौद्ररूप धारण केले. ५ वाजून १० मिनिटांनी मनपा अग्निशमन दलास संपर्क केला असता, अग्निशमन दलाच्या ४ बंब, महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा १ बंब, एमआयडीसी चा १ बंब तसेच सिडको विभागाचा एक बंब च्या साहाय्याने ९ वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू होते. सकाळी १० वाजेपर्यंत ठिकाणी कुलिंगचे काम सुरू होते.