Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगस्वस्त नाही, वजनाने हलके झाले Gas Cylinder

स्वस्त नाही, वजनाने हलके झाले Gas Cylinder

गॅस सिलेंडर स्वस्त नाही तर वजनाने हलका झाला आहे. त्याला कंपोझिट सिलेंडर म्हणतात. दहा किलोची हांडी 636 रुपयांना सध्या तरी देशातील काही शहरांत उपलब्ध आहे. तेल कंपन्यांनी ग्राहकांसाठी स्वस्त एलपीजी गॅस सिलेंडरचा पर्याय आणला आहे. हा पर्याय स्वीकारल्यानंतर महागडे गॅस सिलेंडर खरेदी करण्याची गरज भासणार नाही एवढंच. 14 किलोची गॅस टाकी घेण्याऐवजी तुम्हाला सहज उचलता येईल अशी दहा किलो गॅसची हांडी मिळेल. नव्या पर्यायामुळे तुम्हाला फक्त 636 रुपयांत गॅस सिलेंडर मिळणार आहे. हा सिलेंडरचा एक नवीन प्रकार आहे ज्याला कंपोझिट सिलेंडर असे नाव देण्यात आले आहे.सध्या इंडेन (Indian Oil) हा सिलिंडर देत आहे. हा सिलेंडर वजनाने हलका असल्याने तो उचलण्यास सोपा राहिल. तसेच गॅसची हांडी पारदर्शक असल्याने गॅस कमी आला, गॅस चोरला ही ओरड ही राहणार नाही. काही दिवसांतच इतर गॅस कंपन्या हा पर्याय तयार करतील. मात्र एवढ्याने हुरळून जाऊ नका. तुमचा 14 किलोचा घरगुती गॅस सिलेंडर आहे त्याच बाजारभावाने तुम्हाला सध्या मिळणार आहे. हजार रुपयांच्या आतबाहेर हा गॅस तुम्हाला सध्या मिळत असेल. त्यामुळे दर महिन्यांचं घराचं बजेट सांभाळताना गृहिणींची तारेवरची कसरत ठरलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -