Sunday, December 22, 2024
Homeबिजनेसशेअर बाजारात पुन्हा फॉर्मात? सेंन्सेक्समध्ये 695 अंकाची वाढ! बँकिंग स्टॉक्सही वाढले

शेअर बाजारात पुन्हा फॉर्मात? सेंन्सेक्समध्ये 695 अंकाची वाढ! बँकिंग स्टॉक्सही वाढले

अर्थसंकल्पानंतर दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजीचं सत्र दिसून आलं. आज (बुधवारी) सेन्सेंक्स 695 अंकांच्या वाढीसह 59,558 वर पोहोचला. तर निफ्टीत 203 अंकांच्या वाढीसह 17,780 अंकांवर बंद झाला. बजाज फिनसर्व्हमध्ये सर्वाधिक तेजी नोंदविली गेली. इंड्सइंड बँक, HCL टेक्नॉलॉजी आणि बजाज फायनान्स यांची कामगिरी सरस राहिली. टेक महिंद्रा स्टॉक गुंतवणुकदारांची आज निराशा झाली. टेक महिंद्रा, नेस्ले इंडिया, अल्ट्राटेक सिमेंट आणि लार्सन अँड टुब्रो सर्वाधिक घसरणीचे शेअर्स ठरले. अर्थसंकल्पाच्या दिवशी काल (मंगळवारी) शेअर बाजार मोठ्या तेजीसह बंद झाला होता. सेन्सेक्स 848.40 अंकांच्या वाढीसह 58,862.57 वर आणि निफ्टी 237.00 अंकांच्या 17,576.85 वर बंद झाला होता. केंद्रीय अर्थसंकल्पाचे सकारात्मक स्वागत शेअर बाजाराने केल्याच चित्रं दिसून येतं आहे.

आजचे तेजीचे शेअर्स-
• इंड्सइंड बँक (5.75)
• बजाज फिनसर्व्ह (5.04)
• एचसीएल टेक (3.37)
• बजाज फायनान्स (3.32)
• एचडीएफसी लाईफ (3.25)

आजचे घसरणीचे शेअर्स-
• टेक महिंद्रा (-1.51)
• अल्ट्राटेक (-1.00)
• ब्रिटानिया (-0.97)
• नेस्ले (-0.92)
• हिरो मोटोकॉर्प (-0.89)

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -