ताजी बातमी ऑनलाइन टीम
टेलिकॉम कंपनी (reliance jio) आपल्या यूजर्ससाठी एकापेक्षा एक शानदार प्रीपेड प्लान्स सादर करत असते. कंपनीने गेल्यावर्षी आपल्या प्लान्सच्या किंमतीत वाढ केली होती. मात्र, किंमतीत वाढ झाल्यानंतरही जिओकडे इतर कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त प्लान्स उपलब्ध आहेत. जिओच्या स्वस्त प्लान्समध्ये जास्त बेनिफिट्स दिले जात आहेत. कंपनीच्या अशाच स्वस्त प्लान्सविषयी जाणून घेऊया.
जिओच्या १४९ रुपयांच्या प्लानची वैधता २० दिवस आहे. या प्लानमध्ये युजर्सला दररोज १ जीबी यानुसार एकूण २० जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा दिली जात आहे. प्लानमध्ये जिओ अॅप्सचा देखील अॅक्सेस मिळतो.
Jio चा १५२ रुपयांचा प्लान:
जिओच्या (reliance jio) १५२ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची सुविधा मिळते. या प्लानची वैधता २८ दिवस असून, हा जिओफोन प्लान आहे. या प्लानमध्ये दररोज ०.५ जीबी डेटा यानुसार एकूण १४ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये एकूण ३०० एसएमएसची सुविधा मिळते. याशिवाय जिओ अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते.
Jio च्या १७९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज १ जीबी डेटा दिला जात आहे. प्लानची वैधता २४ दिवस असून, यात एकूण २४ जीबी डेटा मिळतो. या प्रीपेड प्लानमध्ये देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. तसेच, दररोज १०० एसएमएस मिळतात. प्लानमध्ये Jio Cinema, Jio TV, Jio Cloud आणि Jio Security चे फ्री सबस्क्रिप्शन मिळेल.
मस्तच! Jio चे सर्वात स्वस्त प्लान्स, फक्त १४९ रुपयात मिळेल…
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -