Friday, March 14, 2025
Homeब्रेकिंगहिंदूस्तानी भाऊमागे भाजपची आयटी सेल, काँग्रेसचा आरोप

हिंदूस्तानी भाऊमागे भाजपची आयटी सेल, काँग्रेसचा आरोप

ताजी बातमी ऑनलाइन टीम

मुंबई – विकास ऊर्फ बबलु पाठक ऊर्फ हिंदूस्तानी भाऊ आणि इतर दोघांना धारावी येथील विद्यार्थी आंदोलन आणि तोडफोड प्रकरणी मंगळवारी धारावी पोलिसांनी अटक केली. इतर दोघांची इकरार खान आणि वकार खान अशी नावे आहेत. बेकायदा जमाव जमवणे, पोलिसांवर दगडफेक करणे, पोलिसाला मारहाण करणे, सरकारी आणि खासगी मालमत्तेचे नुकसान करणे, चिथावणी देणे असे विविध आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत.

न्यायालयाने याप्रकरणी दोन्ही आरोपींना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. धारावी येथे जमावाने एका पोलीस शिपायाला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली, तसेच दोन पोलिसांवर दगडफेक केली होती. दगडफेकीमध्ये ७५ वर्षीय भाजी विक्रेती महिला जखमी झाली होती. त्यानंतर आता काँग्रेसने हिंदूस्तानी भाऊमागे भाजपची आयटी सेल असल्याचा आरोप केला आहे.

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे जनेतेच्या मनात द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे. हिंदूस्तानी भाऊच्या माध्यमातून लोकांवर प्रभाव टाकण्यात आला. भाजपच्या आयटीसेलने हिंदूस्तानी भाऊला पुढे आणले आहे. हिदुस्तानी भाऊच्या मागे असलेली कंपनी भाजपने सुरु केलेली आहे. अभाविप आणि भाजपमधील कार्यकर्ता या कंपनीच्या मागे आहेत. मोदी सरकारचा सोशल मीडियावर पगडा असल्यामुळे एवढे द्वेषपूर्ण आणि शिवीगाळ भाषेची दखल घेतली गेलेली नाही. लोकांना भडकवण्यासाठी, महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी हिंदूस्तानी भाऊचा उपयोग केला जात आहे अशी शंका असल्यामुळे याची चौकशी सरकारने केली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसच्या सचिन सावंत यांनी एबीपी माझासोबत बोलताना केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -