फेसबुकवरील आभासी जग मेटाव्हर्सचे अनेक लोकांना वेध लागले आहे. मेटाव्हर्सवर अभिनेते, अभिनेत्री आणि अन्य लोक सहभागी होऊ लागले आहेत. पण याच दरम्यान एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. एका महिलेने फेसबुकवरील मेटाव्हर्सवर प्रवेश करताच त्यांच्यावर गँगरेप झाल्याचा दावा केला आहे.
लंडनमधील एका ४३ वर्षीय महिलेने मेटाव्हर्समध्ये लॉग इन केले आणि त्यांनी त्यांचा अवतार तयार केला. पण काही क्षणात जे काही घडले त्याचा अनुभव त्यांनी ब्लॉगच्या माध्यमातून शेअर केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, आभासी जगात दाखल झाल्यानंतर ६० सेकंदाच्या आत मेटाव्हर्सवर तीन ते चार पुरुष अवतारांनी आपल्यावर हल्ला केला आणि लैंगिक छळ सुरु केला. हे खूप धक्कादायक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.