Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर : नांदगाव-घुंगूर रस्त्यावर ट्रक पलटी, एक जण जागीच ठार, तर चालक...

कोल्हापूर : नांदगाव-घुंगूर रस्त्यावर ट्रक पलटी, एक जण जागीच ठार, तर चालक गंभीर जखमी

ताजी बातमी ऑनलाइन टीम

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरून गोव्याकडे अवजड मालाची वाहतूक करणारा आयशर ट्रक उलटला. रस्त्याच्या बाजूला असलेल्या चरीत हा ट्रक उलटला. ट्रक उलटून झालेल्या अपघातात ट्रकवरील क्लिनरचा जागीच मृत्यू झाला. रमेश जैस्वाल (अंदाजे वय ३०, रा. भिवंडी, मुंबई) असे दुर्दैवी क्लिनरचे नावं आहे. अपघातात ट्रकचालक राजू नारायण विटकर हाही गंभीर जखमी झाला आहे. शाहुवाडी तालुक्यातील नांदगाव-घुंगूर रस्त्यावरील अवघड वळणावर उतरणीला बुधवारी रात्री उशिरा हा अपघात झाला. अशी माहिती पोलिस निरीक्षक विजय पाटील यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून गोव्यातील एका कंपनीचा माल घेऊन जात होता. अवजड मालवाहू आयशर ट्रकचा अचानक ब्रेक निकामी होऊन चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक रस्त्याच्या कडेला चरीत उलटला. यावेळी ट्रक खाली सापडून रमेश जैस्वाल हा क्लिनर जागीच ठार झाला. तर गंभीर जखमी अवस्थेतील ट्रक चालक राजू नारायण विटकर, (वय ४७, रा. हातवळा जि. अहमदनगर) याला सरकारी रूग्णवाहिकेतून उपचारासाठी कोल्हापूर येथील सी.पी.आर रूग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. शाहूवाडी पोलिसांनी रात्री उशिरा अपघातस्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला. दरम्यान अपघात घटनेला जबाबदार ट्रकचालक राजू नारायण विटकर याच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, असेही पो. नि. विजय पाटील यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -