देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आहे. गेल्या २४ तासांत १ लाख ४९ हजार ३९४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १,०७२ जणांचा मृत्यू झाला आहे. याआधीच्या दिवशीच्या तुलनेत ही रुग्णसंख्या १३ टक्क्यांनी कमी आहे. दिवसभरात २ लाख ४६ हजार ६७४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात १४ लाख ३५ हजार ५६९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दैंनदिन पॉझिटिव्हिटी रेट ९.२७ टक्के आहे.
दरम्यान, देशातील कोरोना मृतांचा आकडा ५ लाखांवर गेला आहे. यामुळे कोरोना मृत्यूंच्या यादीत जगात भारत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. अमेरिकेत ९.१ लाख, ब्राझीलमध्ये ६.३ लाख रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर कोरोना मृत्यूंच्या यादीत भारतानंतर रशियाचा क्रमांक लागतो. रशियात ३.३ लाख लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
१ जुलै २०२० रोजी भारतातील मृतांचा (Covid deaths) आकडा ४ लाखांच्या पुढे गेला होता. त्यानंतर २१७ दिवसांनी मृतांचा आकडा ५ लाखांच्या पुढे गेला आहे. दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले. त्यानंतर देशात लसीकरणाचा वेग वाढल्याने मृत्यूंचे प्रमाण कमी झाले
याआधी देशात बुधवारी दिवसभरात १ लाख ७२ हजार ४३३ कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, १ हजार ८ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. दरम्यान २ लाख ५९ हजार १०७ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. गुरूवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९५.१४ टक्क्यांवर होता. तर, आठवड्याचा कोरोना संसर्गदर १२.९८ टक्के आणि दैनंदिन कोरोना संसर्गदर १०.९९ टक्के नोंदवण्यात आला होता.
कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता खबरदारी म्हणून आतापर्यंत १.३४ कोटी बूस्टर डोस देण्यात आले आहेत.