Sunday, December 22, 2024
Homeराजकीय घडामोडीमोदींच्या राजवटीत भारताला जुमला आणि चीनला रोजगार : राहुल गांधी

मोदींच्या राजवटीत भारताला जुमला आणि चीनला रोजगार : राहुल गांधी

भारतातील बेरोजगारीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा केंद्र सरकारवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे. शुक्रवारी राहुल गांधी यांनी ट्विट करत लिहिले, “भारतासाठी जुमला, चीनसाठी नोकऱ्या… मोदी सरकारने संघटित क्षेत्र आणि एमएसएमई नष्ट केले आहेत, जिथे जास्तीत जास्त नोकऱ्या निर्माण होतात. आणि याचा परिणाम – मेक इन इंडिया आता चीनकडून खरेदी करा. राहुल गांधी यांनी ट्विट सोबत एक व्हिडिओ ही शेअर केला आहे, ज्यामध्ये चीनमधून होणाऱ्या आयातीबाबत आकडे देण्यात आले आहेत. त्यानुसार 2014 पासून चीनमधून आयात कशी वेगाने वाढत आहे. आणि 2021 मध्ये चीनमधून आयातीत 46 टक्क्यांनी विक्रमी वाढ झाली आहे. आता भारतातील बेरोजगारीने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.

राहुल गांधी संसदेत बेरोजगारीबद्दल बोलले आहेत. यावेळी बोलताना ते म्‍हणाले की, “गेल्या वर्षी तीन कोटी तरुणांनी नोकऱ्या गमावल्या. देशात गेल्या 50 वर्षात सर्वाधिक बेरोजगारी आहे. या सरकारने असंघटित क्षेत्र आणि लघु उद्योगांवर हल्ला केला. नोटाबंदी आणि चुकीच्या पद्धतीने जीएसटी लागू करून हा हल्ला करण्यात आला. असंघटित क्षेत्रात मेक इन इंडियाची अंमलबजावणी होऊ शकत नाही, हे क्षेत्र उद्ध्वस्त झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -