Sunday, December 22, 2024
Homeतंत्रज्ञानखुशखबर!, 100 पेटीएम भाग्यवंतांना एलपीजी गॅस सिलेंडर मिळणार मोफत

खुशखबर!, 100 पेटीएम भाग्यवंतांना एलपीजी गॅस सिलेंडर मिळणार मोफत

युपीआय पेमेंट वॅलेट (UPI Payment Wallet) सेवा पुरवठादार वापरकर्त्यासाठी रोज नव-नव्या ऑफर्स उपलब्ध करुन देते. कॅशबॅक, अधिकच्या खरेदीवर डिस्काऊंट अथवा इतर कंपन्यांचे शॉपिंग कुपन इतर काही योजना, सूट, सवलत आणि बरचं काही दररोज तुमच्या मोबाईल स्क्रीनवर आदळत असते. पण त्यातील काहीच योजना, संधी कामाच्या असतात. कॅशबॅक अथवा पाईंटस्, रिवॉर्डस् यामुळे तुम्हाला दुहेरी फायदा मिळतो. काही कंपन्या भन्नाट ऑफर्स घेऊन येतात. ही संधी तुम्हाला हेरता आणि मिळवता आली तर तो दिवस साजरा होतो. पेटीएमने नेही ग्राहकांसाठी अशीच भन्नाट योजना आणली आहे. पेटीएमने आपल्या युजर्ससाठी एलपीजी सिलेंडर बुकिंगवर मोठी ऑफर दिली आहे.

पेटीएमकडून वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जात आहेत. एका ऑफर अंतर्गत तुम्हाला 25 पौंडची सूट मिळू शकते, तर दुसरी ऑफर म्हणजे तुम्हाला पेटीएम कॅशबॅक म्हणून 30 पौंड मिळू शकतात. तसेच तिसरी ऑफर सध्या सुरू आहे. या ऑफर अंतर्गत तुम्हाला एलपीजी सिलेंडर मोफत मिळू शकतो. म्हणजे तुम्हाला एक पैसाही द्यावा लागणार नाही.

या सर्व व्यवहारासाठी एक सामान्य आणि आवश्यक अट म्हणजे हे बुकिंग पेटीएमद्वारे केलेले असावे. अजून एक अट म्हणजे पेटीएमवरुन गॅस बुकिंग करण्याची ही तुमची पहिली वेळ असावी. पेटीएममध्ये ग्राहकांसमोर तिन्ही पर्याय असतील. तुम्हाला 25 रुपयांची सूट हवी असेल तर तुम्हाला ती लगेच मिळेल. जर तुम्हाला 30 रुपयांचा कॅशबॅक हवा असेल तर तुम्हाला पेटीएम कॅश मिळेल. यासाठी वेगवेगळे प्रोमोकोड देण्यात आले आहेत, जे बुकिंगच्या वेळी द्यावे लागतील. पण फुकटात, 100 टक्के कॅशबॅक मिळवण्यासाठी तुमचं नशीब जोरावर पाहिजे. नशिबाने साथ दिल्यास तुम्हाला एक महिन्याचा गॅस पूर्णतः मोफत मिळेल. त्यासाठी तुम्हाला एक छदामही द्यावा लागणार नाही.

तुम्ही इंडेन, एचपी गॅस आणि भारतगॅसमधून कोणत्याही कंपनीचे सिलेंडर बुक करू शकता. ‘बुक माय सिलिंडर’ टॅबवर जावे लागेल. येथे तुम्हाला तुमचा मोबाइल क्रमांक किंवा एलपीजी आयडी किंवा ग्राहक क्रमांक टाकावा लागेल. यात प्रवेश करताच तुम्हाला तुमच्या एजन्सीची माहिती मिळेल. त्यानंतर तुम्ही पेमेंट करू शकता. पेमेंटसाठी तुम्हाला पेटीएम वॉलेट, पेटीएम यूपीआय, कार्ड आणि नेट बँकिंगचे पर्याय उपलब्ध असतील. एकदा बुकिंग झालं की, तुमच्या पत्त्यावर एजन्सीकडून सिलेंडर पोहोचवला जाईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -