Wednesday, March 12, 2025
Homeमहाराष्ट्रमृत कामगारांच्या कुटुंबीयांना ठाकरे सरकारने दिला मदतीचा हात

मृत कामगारांच्या कुटुंबीयांना ठाकरे सरकारने दिला मदतीचा हात

पुण्यातील येरवड्यामधील शास्त्रीनगर परिसरात वाडिया बंगल्याजवळ इमारत स्लॅबची जाळी कोसळून 5 कामगारांना प्राण गमवावे लागणे, हे अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मृत्युमुखी पडलेल्या कामगारांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच अजित पवार यांनी मृत कामगारांच्या कुटुंबीयांबद्दल सहसंवेदनाही व्यक्त केल्या असून पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दुर्घटनेची माहिती घेतली. इतर जखमी कामगारांवर उपचार सुरळीत सुरु राहतील, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडण्याच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, या घटनेमागची कारणे शोधून त्रुटी दूर केल्या जातील. दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असेही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, येरवड्यामध्ये अंडर-कंन्स्ट्रक्श मॉलच्या स्लॅबची जाळी गुरुवारी रात्री कोसळली. त्याखाली दबून 5 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर या दुर्घटनेमध्ये 5 कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसंच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून देवदूत पथकासह घटनास्थळी धाव घेत बचावकार्य युद्धपातळीवर करण्यात आले. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -