Friday, October 18, 2024
Homeमनोरंजनअभिषेकच्या एका चुकीमुळे अमिताभ बच्चन यांना मागावी लागली होती माफी!

अभिषेकच्या एका चुकीमुळे अमिताभ बच्चन यांना मागावी लागली होती माफी!

बॉलिवूड अभिनेता असो किंवा अभिनेत्री त्यांच्याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी लोक खूप उत्सूक असतात. इतकेच नाही तर सिनेतारकांच्या खासगी आयुष्याबाबतच्या चर्चा चव्हाट्यावर होताना दिसतात. असाच एक किस्सा बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनशी संबंधित आहे. आज (5 फेब्रुवारी) अभिषेकच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तो वाचकांसाठी घेवून आलो आहे. एका मुलाखतीत अभिषेकने त्याच्या आयुष्याशी निगडीत एक किस्सा शेअर केला होता. अभिषेकच्या एका चुकीमुळे त्याचे वडील म्हणजे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन मान खाली घालावी लागली होती. त्यांना माफी देखील मागावी लागली होती.

बालपणी अभिषेक बच्चन याने अर्चना पुरण सिंह हिला स्विमिंग पूलमध्ये ढकलून दिल्याने बिग बी अमिताभ बच्चन यांना आपल्या मुलाचा खूप राग आला होता. अभिषेकच्या कृत्यामुळे अमिताभ आणि जया बच्चन यांना मान खाली घालावी लागली होती. इतकेच नाही तर अमिताभ आणि जया यांनी अर्चनाची माफी देखील मागितली होती. अर्चना हिला कुर्ता ऑफर करण्यात आला मात्र, तो तिने नाकारला होता. पार्टी झाल्यानंतर अमिताभ आणि जया या दोघांनी अभिषेकला चांगलेच फटकारले होते. यापुढे असे करायचे नाही, अशी ताकिद देखील दिली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -