Friday, July 25, 2025
Homeब्रेकिंगजवाहर कारखान्याच्या कामगारांना जानेवारी महिन्यापासून पगार वाढ

जवाहर कारखान्याच्या कामगारांना जानेवारी महिन्यापासून पगार वाढ

ताजी बातमी ऑनलाईन टीम

हुपरी येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना कामगारांना जानेवारी २०२२ च्या पगारात १२ टक्के वेतनवाढ लागू करण्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी केली होती. त्यानुसार कामगारांना जानेवारी महिन्याचे वेतन वाढीसह खात्यावर जमा करण्यात आले आहे. याबद्दल कामगार संघटनेच्यावतीने कारखान्याचे चेअरमन सहकार महर्षी कल्लाप्पाण्णा आवाडेदादा, संचालक आमदार प्रकाशआण्णा आवाडे, माजी चेअरमन उत्तम आवाडे आणि व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले यांचा सत्कार करण्यात आला.

राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी शासनाने त्रिपक्षीय समिती स्थापन केली होती. या समितीच्या बैठकांमध्ये राज्यातील साखर कारखान्यांमधील कामगाराच्या मागण्याबाबत सामजस्य करार करण्यात आला. हा करार महाराष्ट्रातील साखर व उपपदार्थ उद्योगातील १ एप्रिल २०१९ व त्यानंतर हजेरी पत्रकावर असलेल्या सर्व कायम, हंगामी कायम व हंगामी कामगारांना लागू करण्यात आला आहे. या करारानुसार आता या कामगारांना अस्तित्वात असलेल्या मूळ पगार, महागाई भत्ता, स्थिर भत्ता मिळून १२ टक्के पगारवाढ करण्यात आली.

त्यानुसार जवाहर साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांना जानेवारी २०२२ पासून १२ टक्के पगारवाढ करून वाढीसह पगार वर्ग केला गेला आहे. जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने नेहमीच शेतकरी व कर्मचाऱ्यांचे हित जोपासण्याचे काम केले आहे. १२ टक्के पगार वाढीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पगार वाढीसाठी कारखाना केन कमिटी चेअरमन डॉ. राहुल आवाडे, कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांच्यासह सर्व संचालक, खातेप्रमुख व विभागप्रमुख यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी कामगार संघटना अध्यक्ष सर्जेराव हळदकर, खजिनदार रघुनाथ मुधाळे, जॉ. सेक्रेटरी शांतीनाथ चौगुले, जॉ. सेक्रेटरी महावीर कल्याणी, सुरेश पोवार, वृषभ ऐतवडे, अविनाश कांबळे, श्रीकांत करडे, शंकर पाटील, बाबु दोडण्णावर, ग्रा. पं. सदस्य अनिकेत चौगुले उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -