Monday, December 23, 2024
Homeजरा हटकेसिंगल आहात! असा साजरा करु शकता व्हॅलेंटाईन डे

सिंगल आहात! असा साजरा करु शकता व्हॅलेंटाईन डे

ताजी बातमी ऑनलाईन टीम

आठवडा उरला आहे. आजपासून खरं तर व्हॅलेंटाईन फिवर चढायला सुरूवात झाली आहे. या काळात कपल्सना (Couple) एकमेकांसाठी खूप गोष्टी कराव्या वाटतात. रोज वेगवेगळे दिवस असल्याने भेटण्यासाठी छान निमित्तही मिळतं. पण जे लोकं सिंगल आहेत म्हणजेच जे रिलेशनशीपमध्ये (Relationship) नाहीत ते मात्र हा आठवडा एकट्याने कसा घालवायचा या विचारात असतात. कारण त्यांचे अनेक मित्र-मैत्रीणी व्हेलेंटाईन डे (Valentine Day) साजरे करायला गेलेले असतात. अशावेशळी सिंगल्सना (Single) आणखी एकट वाटू शकतं. पण तुम्ही या व्हेलेंटाईनला स्वत:ला एकटं न समजता उलट एन्जॉय करा. तुम्हीही तुमच्या पद्धतीने मस्तपैकी हा दिवस साजरा करू शकता. त्यासाठी खालील चार पर्यायांचा नक्की विचार करा.

मित्र-मैत्रीणींबरोबर मजा करा- व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने तुम्ही जुन्या मित्र-मैत्रीणिंना भेटू शकता. त्यांना घरी बोलावून गप्पा मारून मग तुम्ही लंच किंवा डिनरला जाऊ शकता. जे तुमच्याप्रमाणे सिंगल आहेत अशा मित्र-मैत्रीणीबरोबर तुम्ही वेळ घालवू शकता. त्यामुळे तुम्हा दोघांनाही एकट वाटणार नाही. तुम्हाला कपल्सपेक्षा जास्त मजा करता येऊ शकते.

कुटुंबासोबत फिरायला जा- सिंगल लोक कुटूंबाबरोबरही व्हॅलेंटाईन डे साजरा करू शकतात.घरातल्यांबरोबर बाहेर जायचा प्लॅन करा. फक्त कपल्सनी प्रेम व्यक्त करायचं असं थोडीच आहे. तुम्ही कुटूंबातल्या लोकांवरही तुमचे प्रेम व्यक्त करू शकता. तुम्ही कुटूंबातल्या सदस्यांना आय लव्ह यू म्हणून त्यांच्या अधिक जवळ येऊ शकता.

वेब सिरिज किंवा पिच्चर बघा- व्हेलेंटाईन डे च्या दिवशी तुम्ही मित्र-मैत्रीणी किंवा कुंटूबातल्या लोकांबरोबर मिळून पिच्चर पाहायला जाऊ शकता. वाटल्यास घरीही कोणतीतरी वेब सिरीज पाहू शकता. हे पाहताना तुम्हाला पार्टनर हवाच असं वाटणार नाही. उलट एकट्याने पिच्चर पाहण्याची मजा वेगळीच असते.

शॉपिंग करा- सिंगल असूनही तुम्हाला व्हेलेंटाईन डेला एन्जॉय करायचं असेल तर भरपूर खरेदी करणे हा मस्त पर्याय आहे. शॉपिंग केल्याने तुमचा वेळ मस्त जाईल. तसंच तुम्ही विंडो शॉपिंग करू शकता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -