Sunday, December 22, 2024
Homenewsकोरोना काळातील स्थलांतरावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र सरकार आणि काँग्रेसवर गंभीर आरोप,...

कोरोना काळातील स्थलांतरावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र सरकार आणि काँग्रेसवर गंभीर आरोप, काय म्हणाले मोदी?

ताजी बातमी ऑनलाईन टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर झालेल्या चर्चेत उत्तर दिलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर विचार प्रकट करणाऱ्या सर्व पक्षांच्या सदस्यांचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना श्रद्धांजली अर्पण करुन केली. ‘देशानं आदरणीय लता दीदीला गमावलं आहे. एवढा मोठा काळ ज्यांच्या आवाजाने देशाला मोहित केलं, देशाला प्रेरित केलं, देशाला भावनांनी भरलं. मी आज आदरणीय लतादीदींना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो’, असं मोदी म्हणाले. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांनी कोरोना संकटाच्या (Corona Outbreak) काळात पहिल्या लाटेवेळी कामगारांच्या स्थलांतरावरुन महाराष्ट्र, दिल्ली सरकार आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘कोरोनाच्या पहिल्या लाटेत देश जेव्हा लॉकडाऊनचं पालन करत होतं. who सल्ला देत होतं. तज्ज्ञ म्हणत होते की जो तिथे आहे तिथेच थांबा. कारण माणूस एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी जात असेल आणि तो कोरोना संक्रमित असेल तर त्याच्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. तेव्हा काँग्रेसनं काय केलं, तर मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर उभं राहून लोकांना मुंबई सोडून जाण्यासाठी प्रोत्साहित केलं. कामगार, मजुरांना तिकीटं देण्यात आली. लोकांना प्रेरित करण्यात आलं. महाराष्ट्रात आमच्यावर जो बोज आहे तो जरा कमी व्हावा. तुम्ही जा… तुम्ही उत्तर प्रदेशचे आहात. तुम्ही बिहारचे आहात. जा… तिथे कोरोना पसरवा. तुम्ही हे मोठं पाप केलं. अफरातफरीचं वातावरण निर्माण केलं. कामगार बांधवांना अनेक कठीण प्रसंगात ढकलून दिलं’, अशी घणाघाती टीका पंतप्रधान मोदी यांनी केलीय.

दिल्लीतील सरकारनं तर गाड्यांवर माईक, स्पीकर लावून झोपडीत राहणाऱ्या कामगार, मजुरांना त्यांच्या गावी जाण्यास सांगितलं त्यांच्यासाठी बसेस दिल्या. पण त्यांना अर्ध्या रस्त्यात सोडून त्यांच्यासमोर अडचण निर्माण केली. त्याचं कारण असं झाली की उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाबमध्ये कोरोनाचा जास्त प्रसार नव्हता. पण तिथे कोरोना संकट वाढवण्याचं पाप काँग्रेसनं केलं, असा गंभीर आरोप पंतप्रधान मोदी यांनी केलाय.

भाजप सरकारच्या योजनांचा पाढा मोदींनी वाचला
‘गेल्या काही वर्षात अनेक क्षेत्रात आपण मजबुतीने पुढे आलो. पीएम आवास योजना, गरीबांना राहण्यासाठी घरे असावे. हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. पण आपण त्याला गती दिली. त्यामुळे गरीबांचे घर सुद्धा लाखोंपेक्षा अधिक किमतीचे होत आहे. ज्या गरीबाला पक्के घर मिळते तोही लखपतीच्या श्रेणीत येतो. गरीबांच्या घरात शौचालये आले आहेत. त्यामुळे उघड्यावर शौच करणं बंद झालं आहे. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर गरीबाच्या घरात उजेड आला तर त्याचा आनंद देशाचा आनंद वाढवतो. गरीबाच्या घरात गॅस कनेक्शन असेल, चुलीमुळे होणाऱ्या धुरापासून त्याला मुक्ती मिळेल तर त्याच्या चेहऱ्यावरील

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -