Thursday, February 6, 2025
Homeराजकीय घडामोडीआ. नितेश राणे ‘आयसीयू’त, छातीत वेदना होत असल्याची माहिती

आ. नितेश राणे ‘आयसीयू’त, छातीत वेदना होत असल्याची माहिती

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्लाप्रकरणी न्यायालयीन कोठडीतील भाजपचे आमदार नितेश राणे यांची सोमवारी येथील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. छातीत वेदना होत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना ओरोस (जि. सिंधुदुर्ग) येथून पोलिस बंदोबस्तात कोल्हापुरात हलविण्यात आले.

परब हल्लाप्रकरणी नितेश राणेंसह त्यांचे स्वीय सहायक राकेश परब यांना अटक करण्यात आली. पोलिस कोठडीनंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला.

शुक्रवारी प्रकृतीचा त्रास होत असल्याची तक्रार केल्यानंतर राणे यांच्यासह परब यांना वैद्यकीय तपासणीसाठी कोल्हापूरला हलविण्यात येणार होते. मात्र, त्याच दिवशी सीपीआरमधील डॉक्टरांच्या पथकाने सायंकाळी सिंधुदुर्गात जाऊन तपासणी केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -