Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रतिसर्‍या लाटेतून राज्य बाहेर! पुणे, नागपूर वगळता मुंबईसह उर्वरित महाराष्ट्राला दिलासा

तिसर्‍या लाटेतून राज्य बाहेर! पुणे, नागपूर वगळता मुंबईसह उर्वरित महाराष्ट्राला दिलासा

कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत सोमवारी नोंदवली गेलेली घट पाहता पुणे, नागपूर वगळता मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाच्या तिसर्‍या लाटेतून बाहेर आल्याचे मोठे दिलासादायक वृत्त असून, देशभरातही सोमवारी रुग्णसंख्येत मोठी घट नोंदवली गेली.

सोमवारी महाराष्ट्रात 6 हजार 436 रुग्णांची नोंद झाली, तर 18 हजार 423 रुग्ण बरे झाले. राज्यात सध्या 1 लाख 6 हजार रुग्ण सक्रिय आहेत. सोमवारी पुणे सर्कलमध्ये सर्वाधिक 1744 नवे रुग्ण आढळले. त्या खालोखाल नागपूर सर्कलमध्ये 1044 रुग्णांची भर पडली.

अन्य सर्कल्सपैकी अकोला सर्कलमध्ये 205, लातूर सर्कलमध्ये 283, औरंगाबाद सर्कलमध्ये 464 आणि कोल्हापूर सर्कलमध्ये 328 नवे रुग्ण आढळले. राज्यात एकाही ओमायक्रॉन रुग्णाची नोंद झाली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -