भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन आणि मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर यांची कोविड १९ चाचणी निगेटिव्ह आली आहे. निगेटिव्ह आल्यानंतर दोघांना प्रशिक्षणात सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. एएनआयने याबाबत एक ट्विट करून माहिती दिली आहे.
सूत्राने एएनआयला सांगितले की, ऋतुराज गायकवाड अजूनही आयसोलेशनमध्ये आहे. तर धवन आणि श्रेयस अय्यर यांची कोविड चाचणी निगेटिव्ह आली आहे. ते दोघे प्रशिक्षण शिबिरात सहभागी होऊ शकतात. धवन आणि अय्यर मंगळवारी भारतीय संघासोबत संध्याकाळच्या सराव सत्रात सहभागी होतील. भारतीय संघाचे चार खेळाडू शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर आणि नवदीप सैनी हे पहिल्या वनडे सामन्यापूर्वी कोविड पॉझिटिव्ह आले आढळले होते. त्यामुळे हे खेळाडू पहिल्या वनडेच्या प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर होते.