ताजी बातमी ऑनलाइन टीम
कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी (दि.10) बंद राहणार आहे, तर शुक्रवारीही (दि.11) अपुर्या दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
रंकाळा येथील डी मार्टजवळ 27 इंची व्यासाच्या मुख्य वितरण नलिकेला अचानक गळती लागली आहे. ही गळती काढण्याचे काम गुरुवारी करण्यात येणार आहे. चंबुखडी टाकीतून शहराला पाणीपुरवठा करणारी ही मुख्य वितरण नलिका असल्याने शहरातील ए, बी, सी, डी, ई वॉर्ड, त्याला संलग्न उपनगरे तसेच ग्रामीण भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
, बी वॉर्डमधील फुलेवाडी, लक्षतीर्थ वसाहत, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, आपटेनगर, साने गुरुजी वसाहत परिसर, तुळजा-भवानी कॉलनी, देवकर पाणंद, हरिओमनगर, जुना वाशी नाका, शिवाजी पेठ, खरी कॉर्नर, मिरजकर तिकटी, मंगळवार पेठ, टिंबर मार्केट, शालिनी पॅलेस, जावळाचा गणपती परिसर. सी व डी वॉर्डमधील दुधाळी, गंगावेश, बुधवार पेठ तालीम, सिद्धार्थनगर, ब्रह्मपुरी, पापाची तिकटी, महापालिका, लक्ष्मीपुरी, बिंदू चौक, बाजार गेट, शुक्रवार पेठ, शनिवार पेठ, महालक्ष्मी मंदिर, दसरा चौक, आझाद चौक. ई वॉर्डमधील खानविलकर पेट्रोल पंप परिसर, शाहूपुरी 5, 6, 7 वी गल्ली, कुंभार गल्ली, आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल, बागल चौक, बी.टी.कॉलेज या ठिकाणी पाणीपुरवठा होणार नाही. या काळात महापालिकेने टँकरने पाणी वाटपाचे नियोजन केले आहे.
कोल्हापूर ; पाणी जपून वापरा मुख्य नलिकेला अचानक गळती( भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. )
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -