ताजी बातमी ऑनलाइन टीम
बिचुकले (ता. कोरेगाव) येथे बुधवारी शर्यतीची बैलगाडी पळवत असताना बैलांना आवर घालणे गाडीवानाला शक्य न झाल्याने उधळलेली बैलगाडी बैलांसह विहिरीत पडल्याने दोन्ही बैल ठार झाले. सुदैवाने गाडीवान बचावला. या दुर्घटनेत बैलांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
बिचुकले (ता. कोरेगाव) येथे बुधवारी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती. आखाड्यात बैलगाडी पळवत असताना गाडीवानाला बैलांना आवर घालता आला नाही. उधळलेली बैलगाडी आखाड्यानजीक असलेल्या विहिरीत जाऊन पडली. सुदैवाने गाडीवानाने गाडीतून उडी मारल्याने तो बचावला आहे.
ही घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली. यानंतर अनेक जणांनी तेथून काढता पाय घेतला. यातील काही जणांनी वाठार पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. यानंतर उपस्थितांकडून घटनेचा माहिती जाणून घेतली
या माहितीवरून शर्यत आयोजक संदीप नारायण मोहिते (रा. फडतरवाडी, ता. फलटण), दत्तात्रय बाळकृष्ण पवार (रा. बिचुकले, ता. कोरेगाव), समीर (पूर्ण नाव माहित) (रा. आदर्की, ता. फलटण), बैलगाडी मालक लक्ष्मण दत्तात्रय झांजुर्णे (रा. तडवळे संमत कोरेगाव, ता. कोरेगाव) अप्पा पैलवान (पूर्ण नाव माहित नाही) (कुमठे, ता. कोरेगाव) यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पाटील सचिन रामचंद्र कदम यांनी फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी आयोजकांना ताब्यात घेतले आहे.
बिचुकले येथे आयोजित केलेल्या शर्यतीत मृत्यूमुखी पडलेल्या बैलांचे मालक मुंबई येथील असल्याची तर ती सांभाळण्यासाठी परिसरातीलच एका शर्यत शौकीनाकडे असल्याची चर्चा घटनास्थळावर सुरू होती. मृत्यूमुखी पडलेल्या दोन्ही बैलांची किंमत अंदाजे पाच ते सहा लाख रुपये असल्याची बैलगाडा शौकीन बोलत होते.
शर्यतीची बैलगाडी पडली विहिरीत
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -