Sunday, December 22, 2024
Homeराजकीय घडामोडी‘कुठल्या ना कुठल्या प्रकरणात अडकवा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आदेश दिला’, रवी राणांचा...

‘कुठल्या ना कुठल्या प्रकरणात अडकवा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आदेश दिला’, रवी राणांचा आरोप

भाजपचे नेते विरुद्ध महाराष्ट्र विकास आघाडी सरकार असा संघर्ष आता पुन्हा पेटू लागला आहे. भाजप आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कुठल्या ना कुठल्या प्रकरणात अडकवा, असा आदेशच उद्धव ठाकरेंनी दिल्याचं रवी राणा यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पोलिसांच्या मदतीनं दबावतंत्र महाराष्ट्र सरकारकडून वापरलं जात असल्याचा आरोप रवी राणांनी केलाय. देशात शाईफेकीच्या घटना घडल्या, पण 360 म्हणजेच जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा माझ्यावर गुन्हा दाखल झाला, यातून नेमकं काय प्रतीत होत असा प्रश्न रवी राणा यांनी उपस्थित केलाय.

संजय राऊत, अनिल परब, दिलीप वळसे, मुख्यमंत्र्यांनी सीपींना फोन लावून सांगितलं की रवी राणाला अटक करा, असंही त्यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल, तर संजय राऊतांवरही 506 चा गुन्हा दाखल करा असं थेट आव्हान रवी राणा यांनी यावेळी दिलं. येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे, अनिल परबच्या प्रॉपर्टींवर कारवाई होईल, आणि मीही पुरावे देईन, असे आरोप आमदार रवी राणा यांनी केले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -