मेड इन दक्षिण कोरिया असलेल्या ह्युंदाई आणि किया या कार कंपन्यांनी यूएसमधील ४ लाख ८४ हजार वाहनांबाबत महत्वाची सूचना दिली आहे. तुम्ही राहत असलेल्या मोकळ्या जागेत ह्युंदाई आणि किया मालकांनी आपली कार लावावी अशी सूचना केली आहे. या कारला केव्हाही आग लागण्याची शक्यता असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. ही वाहने दुरुस्त न केल्यास त्यात आग लागण्याचा धोका आहे.
कोरियातील Hyundai आणि Kia या दोन्ही कंपन्यांनी US मधील वाहनांसाठी स्वतंत्र रिकॉलची घोषणा केली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की या वाहनांमधील हायड्रॉलिक इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट मॉड्यूलमध्ये बिघाड असू शकतो.