ताजी बातमी ऑनलाइन टीम
एयरटेलने या वर्षी पुन्हा टॅरिफ प्लॅनमध्ये (airtel plans) वाढ करणार असल्याचे संकेत दिले आहेत. प्रति युजर सरासरी महसूल (ARPU) 200 रुपयांपर्यंत नेण्याचं कंपनीचं उद्दिष्ट आहे. त्यासाठीच कंपनी ग्राहकांना टॅरिफ वाढवून धक्का देण्याच्या तयारीत आहे.
तिसऱ्या तिमाहीमध्ये झालेल्या चांगल्या कामगिरीसाठी टॅरिफ वाढ आणि गुगलने केलेल्या गुंतवणुकीचं (Google Investment In Airtel) महत्त्वपूर्ण योगदान आहे. या तिमाहीमध्ये कंपनीची कमाई 12.6 टक्क्यांनी वाढून 29,867 कोटी रुपये झाली आहे, जी मागील वर्षात याच तिमाहीमध्ये 26,518 कोटी रुपये होती.
एअरटेल च्या प्लॅनच्या (airtel plans) किमती पुन्हा वाढू शकतात. तसंच जर दोन ते चार महिन्यात टॅरिफ प्लॅनमध्ये वाढ झाली नाही, तर या वर्षाच्या अखेरीस यात वाढ होऊ शकते. कंपनीला 2022 मध्ये ARPU प्रति युजर सरासरी महसूल 200 रुपये दरमहा करण्याची अपेक्षा आहे.
कंपनीच्या प्रति ग्राहक सरासरी कमाईमध्ये (ARPU) मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. भारती एयरटेलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल विट्टल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाइल फोन सेवांच्या दरांमध्ये नुकत्याच झालेल्या वाढीमुळे प्रति ग्राहक सरासरी कमाई (ARPU) 163 झाली आहे.
Airtel ग्राहकांना झटका, पुन्हा वाढणार….
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -