Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगपंढरपूर : दर्शन रांगेत 50 हजार भाविक ( वाचा सविस्तर )

पंढरपूर : दर्शन रांगेत 50 हजार भाविक ( वाचा सविस्तर )

ताजी बातमी ऑनलाइन टीम

शनिवारी (दि. 12) माघी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटकसह विविध राज्यांतून भाविक पंढरीत दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारीच दर्शन रांग मंदिरापासून पुढे स्काय वॉक ते सारडा भवन च्या पुढे गेली असून दर्शन रांगेत 50 हजार भाविक दाखल झाले आहेत. शहरात दोन लाखांहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाल्याने पंढरीनगरी भाविकांनी गजबजली आहे.

मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माघी यात्रा केवळ मर्यादित स्वरूपात साजरी झाली होती. भाविकांना यात्रेला मुकावे लागले होते. तर यावेळेस कोरोनानंतर प्रथमच माघी यात्रा भाविकांच्या उपस्थित साजरी होत आहे. त्यामुळे भाविकांमधून उत्साह असून भाविक मजल दर मजल करत पंढरीच्या दिशेने येत आहेत. पंढरीत दाखल झालेले भाविक 65 एकर परिसरात तंबू, राहुट्या उभारुन वास्तव्य करत आहेत. तर चंद्रभागा स्नानासाठी देखील भाविकांची गर्दी दिसून येत आहे.

चंद्रभागा स्नान करुन भाविक मुख दर्शन घेण्यासाठी पसंती देत आहे. यामुळे मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे. तर दर्शन रांगेतून मुख दर्शन घेण्यासाठी देखील भाविक तासनतास दर्शन रांगेत उभारत आहेत. गुरुवारी दर्शन रांग मंदिरापासून स्काय वॉक ते पुढे सरडा भवनच्या पुढे गेली आहे. या दर्शन रांगेत 50 हजार भाविक उभारले आहेत.

आणखी दर्शन रांग पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने दर्शन रांगेतील भाविकांना शुध्द पिण्याच्या पाण्याची व चहाची व्यवस्था मोफत करण्यात आलेली आहे तर दर्शन रांगे पुढे पत्राशेड पर्यंत उभारण्यात आली असून रात्रीच्यावेळी प्रकाश व्यवस्था, सीसीटिव्ही व पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.

माघी वारीत येणार्‍या भाविकांना आवश्यक सोयी-सुविधा तात्काळ मिळाव्यात. त्याचबरोबर आरोग्याच्या व सुरक्षिततेच्यादृष्टीने कोणतेही गैरसोय येऊ नये. यासाठी पत्राशेड, 65 एकर, चंद्रभागा वाळवंट, विठ्ठल-रुक्मिणी मंदीर, नगरपालिका या पाच ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. तर पोलीस विभागाकडून पोलीस मदत कक्ष कार्यरत आहे. पोलीसांकडून वाहतूक व्यवस्था सुरळीत केली जात आहे.
भाविकांना स्नानासाठी चंद्रभागेत इसबावी बंधार्‍यातून पाणी सोडण्यात आले आहे. तर आरोग्य विभागामार्फत यासाठी पत्राशेड, 65 एकर, चंद्रभागा वाळवंट, विठ्ठल-रुक्मिणी मंदीर येथे प्रथमोपचार केंद्र उभारण्यात आली असून भाविकांना सेवा देण्यास सज्ज झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -