Friday, September 20, 2024
Homeराजकीय घडामोडीकाँग्रेस सरकारच्या काळात महागाई अधिक होती : निर्मला सितारामन

काँग्रेस सरकारच्या काळात महागाई अधिक होती : निर्मला सितारामन

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी राज्यसभेत अर्थसंकल्पाविषयीच्या प्रश्नांवर उत्तरे दिली आहेत. यावेळी निर्मला सितारामन यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस सत्तेत असताना महागाई जास्त होती. काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकाळात तुलना केल्यास काँग्रेसच्या कार्यकाळात महागाई जास्त होती. काँग्रेस सत्तेत असताना महागाईचा दर ९.१ टक्के होता. कोरोना महामारीचा सामना करावा लागत असतानाही भाजपच्या कार्यकाळात महागाईचा दर ६.२ टक्के आहे, असा दावा निर्मला सितारामन यांनी केला.

भारतात क्रिप्टोकरन्सीवर प्रतिबंध लावण्याचा निर्णय हा सर्वांचा विचार लक्षात घेऊन घेण्यात आला आहे, असे सितारामन म्हणाल्या. या आभासी संपत्तीवर कर आकारण्याचा अर्थ असा नाही की सरकार या संपत्तीला वैध ठरवत आहे. ७-८ वर्षांपूर्वी जीडीपीचे उत्पन्न १.१ लाख कोटी रूपये होते. आता ते २.३२ लाख कोटी रूपये झाले आहे. २०१३-१४ मध्ये निर्यात उलाढाल २.८५ लाख कोटी रूपये होती, आज ४.७ लाख कोटी रूपये झाली आहे. २०१३ -१४ मध्ये विदेशी चलन २७५ अरब अमेरिकन डॉलर एवढे होते, सध्या ६३० अरब अमेरिकन डॉलर इतके आहे, असे सीतारामन यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -