ताजी बातमी ऑनलाइन टीम
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. स्वप्निल उत्तम म्हेत्रे (वय ३३ रा. भोनेमाळ) असे त्याचे नांव आहे. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबतची फिर्याद पिडीत मुलीच्या आईने दिली आहे. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, भोनेमाळ परिसरातील स्वप्निल म्हेत्रे याने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अजाणतेपणाचा फायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केला.
१ नोव्हेंबर २०२१ ते ३१ जानेवारी २०२२ या दोन महिन्याच्या कालावधीत राहत्या घराच्या टेरेसवर नेऊन वेळोवेळी तिच्यावर बलात्कार केला. पिडीत मुलीला त्रास होऊ लागल्याने तिने आईला माहिती दिली.
उपचारासाठी तिला इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून पोलिसांच्या मदतीने सीपीआर रुग्णालयात वैद्यकिय तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ती गर्भवती असल्याचे उघडकीस आले. पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन म्हेत्रे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पो.उप.नि राजेंद्र यादव करत आहेत.
इचलकरंजी ; अल्पवयीन मुलीवर बलात्कार युवक पोलिसांच्या ताब्यात
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -