औरंगाबाद शहरात शिवाजी नगर परिसरातील भाजी बाजारात झालेली जबरी चोरी सध्या शहरात मोठा चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे भर बाजारात पोलीसाच्या वेशात दोघे आले. एका निवृत्त मुख्याध्यापकाला गाठलं, एवढं सोनं घालून कुठं फिरताय म्हटले अन् बोलण्यात गुंतवलं. त्यांना अंगावरचं सोनं काढून ठेवायला सांगितलं. मुख्याध्यापकानं एकदा या दोघांवर संशयही घेतला. मात्र त्यांनी आवाज वाढवून तुम्हाला पोलीस स्टेशनलाच घेऊन जातो, अशी धमकी दिली. त्यानंतर हात चलाखी करत हे सोनं स्वतःच्या खिशात टाकलं आणि क्षणात तिथून पोबारा केला. मुख्याध्यापकाच्या हे लक्षात आल्यानंतर मात्र त्यांनी त्वरीत पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी दोघांवर आला गुन्हा दाखल करण्यात आलाअसून पोलीस भामट्यांचा शोध घेत आहेत.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -