Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगआता प्रत्येक कारमध्ये 'थ्री पॉइंट' सीट बेल्ट लावणे अनिवार्य: केंद्र सरकारचा मोठा...

आता प्रत्येक कारमध्ये ‘थ्री पॉइंट’ सीट बेल्ट लावणे अनिवार्य: केंद्र सरकारचा मोठा निर्णय

ताजी बातमी ऑनलाइन टीम

कारमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नितीन गडकरी यांनी महत्वाची माहिती दिली आहे. कारमध्ये मागील सीटवर बसणाऱ्या व्यक्तीसाठी थ्री पॉईंट सीट बेल्टची व्यवस्था नसते. मात्र यापुढे कार निर्मिती करणाऱ्या कंपन्याना मध्यभागी बसणाऱ्या प्रवाशांसाठी थ्री पॉईंट सीट बेल्ट उपलब्ध करुन द्यावा लागेल, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

रस्ते अपघातातील जीवितहानी कमी करण्यासाठी कारमध्ये बसणाऱ्या सर्व प्रवाशांना थ्री पॉईंट सीट बेल्ट अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे थ्री पॉईंट देणं आता कार कंपन्यांना बंधनकारक असणार आहे. याबद्दलच्या फाईलवर मी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे आता कारच्या मागील सीटवर मध्ये बसणाऱ्या व्यक्तींसाठी थ्री पॉईंट सीट बेल्ट देणं बंधनकारक असल्याचे नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले. सध्या पुढच्या दोन्ही सीटवर आणि पाठीमागच्या दोन सीटवर थ्री पॉईंट सीट बेल्ट उपलब्ध आहेत. मागच्या सीटवर केवळ टू पॉईंट सीट बेल्ट देण्यात येतात. परंतु प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन सीट बेल्ट वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

दरवर्षी दीड लाख लोकांचा रोड अपघातात मृत्यु.
दरवर्षी देशात जवळपास 5 लाख रस्ते अपघात होतात. यामध्ये दीड लाख लोकांना आपला जीव गमवावा लागतो. ही संख्या कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे गडकरी यांनी सांगितले. मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवण्याचीही गरज आहे. सरकारने गेल्या महिन्यात आठ आसन क्षमता असलेल्या वाहनांना कार निर्मात्यांप्रमाणेच किमान सहा एअर बॅग असणे बंधनकारक केले होते. हा नियम यावर्षी ऑक्टोबरपासून सुरू होणार होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -