Sunday, December 22, 2024
Homeक्रीडारबाडावर मोठी बोली, पंजाब किंग्जनं ९.२५ कोटींना विकत घेतलं

रबाडावर मोठी बोली, पंजाब किंग्जनं ९.२५ कोटींना विकत घेतलं

ताजी बातमी ऑनलाइन टीम

इंडियन प्रीमिअर लीगचा (#TATAIPLAuction) महालिलाव आज शनिवारी सकाळी ११ वाजता सुरु झाला. भारताचा वेगवान गोलंदाज श्रेयस अय्यर याला सर्वाधिक बोली लागली. त्याला कोलकाता नाइट रायडर्सने १२.२५ कोटींना विकत घेतले आहे. त्यापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेच्या कगिसो रबाडावर मोठी बोली लागली. त्याला पंजाब किंग्जनं ९.२५ कोटींना विकत घेतलं.

भारतीय क्रिकेट संघाचा तडाखेबाज फलंदाज शिखर धवन याच्यासाठी पंजाब किंग्जने ८.२५ कोटी रुपये मोजून आपल्या संघात घेतले आहे. तर आर अश्विन साठी राजस्थान रॉयल्सने ५ कोटी मोजून आपल्या संघात घेतले आहे.

गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपरजायंटस् हे नवीन संघ आल्याने दहा संघांचा दोनदिवसीय लिलावात समावेश आहे. लिलावात ५९० क्रिकेटपटूंवर बोली लागेल, ज्यामध्ये २२७ विदेशी खेळाडू आहेत. यावर्षी दहाहून अधिक खेळाडूंवर दहा कोटींहून अधिकची बोली लागू शकते आणि काही खेळाडू २० कोटींच्या आसपास जाऊ शकतात.

हर्षल पटेल साठी आरसीबी ने मोजले १०.७५ कोटी रूपये

दक्षिण आफ्रिकेच्या रबाडावर मोठी बोली, पंजाब किंग्जनं ९.२५ कोटींना विकत घेतलं

गुजरात टायटन्सने मोहम्मद शमीसाठी मोजले ६.२५ कोटी रूपये. आयपीएल २०२२ मध्ये मोहम्मद शमी गुजरात टायटन्ससाठी खेळताना दिसेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -