ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोरोनाच्या नंतर प्रथमच भरलेल्या माघी यात्रा एकादशीला तीन लाखांहून अधिक भाविकांनी उपस्थिती लावली आहे. हरिनामाच्या जयघोषात भाविक तल्लीन झाले आहेत. चंद्रभागा स्नान, मुख दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांमूळे मंदिर परिसर गजबजला असून भक्तीचा मळा फुलला आहे.
दरम्यान, माघी शुध्द जया एकादशी निमित्त मंदीर समितीच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा संपन्न झाली. विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांच्या हस्ते तर रुक्मिणी मातेची पूजा प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते पहाटे संपन्न झाली.
माघी एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रक्मिणीच्या दर्शनासाठी सुमारे तीन लाखांहून अधिक भाविक दाखल झाले आहेत. मुख दर्शनासाठी मंदिरात आलेल्या भाविकांना माघी एकादशी निमित्त श्रींच्या गाभार्यात व मंदीरात करण्यात आलेल्या आकर्षक फुलांच्या आरासीचेही दर्शन घडत आहे. यामध्ये झेंडू, शेवंती जरबेरा अशा विविध जातींच्या एकूण 1 टन फुलांची मनमोहक आरास करण्यात आली आहे.
माघी वारी : पंढरीत फुलला भक्तीचा मळा, तीन लाखांहून अधिक भाविक दाखल
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -