ताजी बातमी ऑनलाइन टीम
लोहोणेर येथे शुक्रवारी प्रियकरावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणार्या प्रेयसी व तिच्या कुटुंबीयांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.लोहोणेर येथील युवक गोरख बच्छाव (31) हा काही वर्षांपूर्वी रावळगाव (ता. मालेगाव) येथील युवतीच्या संपर्कात आल्याने दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मात्र, युवतीच्या घरच्यांनी तिचे दुसरीकडे लग्न निश्चित केले होते. तो विवाह मोडल्यानंतर तो गोरखनेच मोडल्याचा संशय मुलीच्या कुटुंबीयांना आला. त्यामुळे मुलीसह तिच्या कुटुंबीयांनी गोरखच्या डोक्यात लोखंडी सळईने वार करून मुलीने त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. यात तो 55 टक्के भाजला. त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. घटना घडल्यानंतर संबंधित युवती व तिचे कुटुंबीय स्वतः पोलिसांत हजर झाले होते.
या प्रकरणी देवळा पोलिसांनी प्रेयसीसह तिची आई, वडील व दोन भाऊ अशा पाच जणांना ताब्यात घेतले होते. शनिवारी (दि. 12) त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
युवकास पेट्रोल टाकून जाळणाऱ्या प्रेयसी व कुटुंबीयांना चार दिवस कोठडी
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -