ताजी बातमी ऑनलाईन टीम
महापारेषण कंपनीच्या चंबुखडी सबस्टेशनकडील 33 केव्ही यार्डची दुरुस्ती सोमवारी केली जाणार आहे. त्यामुळे शिंगणापूर अशुद्ध जल उपसा केंद्राकडील पाणी उपसा बंद राहणार असल्याने निम्म्या शहरात सोमवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच मंगळवारी अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
सोमवारी ए, बी वॉर्ड आणि त्यास संलग्नित उपनगरे, ग्रामीण भाग व शहराअंतर्गत येणार्या भागांमध्ये साळोखेनगर टाकी परिसर, कणेरकर नगर, बापूरामनगर, आय.टी.आय. व कळंबा जेल परिसर, आपटेनगर, दत्तोबा शिंदेनगर, जीवबा नाना पार्क, सुभाषनगर पंपिंगवर अवलंबून असणारा परिसर, दादू चौगुले नगर व संलग्नित परिसर, जरगनगर, रामानंदनगर, रायगड कॉलनी, संलग्नित ग्रामीण भाग, संभाजीनगर काही भाग, एल.आय.सी. कॉलनी, देवकर पाणंद काही भाग, साळोखे पार्क, जवाहरनगर, वाय. पी. पोवार नगर व संलग्नित परिसर, शिवाजी पेठ (काही भाग), मंगळवार पेठ (काही भाग), टिंबर मार्केट, गंजीमाळ, वारे वसाहत, विजयनगर, ई वॉर्डातील राजारामपुरी वितरण व्यवस्थेवर अवलंबून असणारा संपूर्ण परिसर, सम्राटनगर, प्रतिभानगर, सायबर चौक, संपूर्ण राजारामपुरी परिसर, शाहू मिल, उद्यमनगर, यादवनगर, राजेंद्रनगर, टाकाळा, दौलतनगर, शाहूपुरीतील (काही भाग), पाच बंगला, साईक्स एक्स्टेंशन, कावळा नाका, रुईकर कॉलनी, लिशा हॉटेल, सह्याद्री सोसायटी, कदमवाडी, राजीव गांधी वसाहत, लोणार वसाहत, शिवाजी पार्क, महाडिक वसाहत या ठिकाणी पाणीपुरवठा होणार नाही.
या कालावधीत नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय होण्याच्या द़ृष्टीने महानगरपालिकेकडील उपलब्ध टँकरव्दारे पाणी वाटपाचे नियोजन केले आहे. तरी उपलब्ध असणारे पाणी संबधीत भागातील नागरीकांनी काटकसरीने वापरून महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
या कालावधीत बालिंगा, बावडा व कळंबा जलशुध्दीकरण केंद्राव्दारे होणारा पाणीपुरवठा नियमित सुरू राहणार आहे.
कोल्हापूर : निम्म्या शहरात आज पाणी नाही
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -