ताजी बातमी ऑनलाईन टीम
देवळा तालुक्यातील लोहोणेर येथे प्रेयसीने व तीच्या कुटुंबीयांनी जिवंत जाळलेल्या प्रियकराचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तरुणी व तीचे आई-वडील आणि दोन भाऊ (रावळगाव ता. मालेगाव) यांनी मुलाच्या गावात जाऊन त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. शुक्रवारी हा प्रकार घडला होता. या घटनेत प्रियकर तरुण 80 टक्के भाजल्याची माहिती समोर आली होती.
सात वर्षांच्या प्रेम प्रकरणानंतर झालेला ब्रेक अप आणि आपले इतरत्र ठरलेले लग्न मोडल्याच्या संशयातून प्रेयसीने प्रियकर गोरख बच्छाव याच्या अंगावर पेट्रोल टाकून प्रेयसी आणि तिच्या कुटुंबीयांनी त्याला जिवंत जाळले होते. त्याच्यावर नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. देवळा पोलिसांनी या प्रकरणी प्रेयसी कल्याणी सोनवणेसह तिची आई, वडील आणि दोन भाऊ अशा पाच जणांना अटक केली आहे. दरम्यान व्हॅलेंटाइन डे च्या दिवशी तरुणाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
प्रेमात ब्रेकअप, प्रेयसीने जिवंत जाळलेल्या प्रियकराचा मृत्यू; प्रेयसीसह तिच्या आईवडिलांना अटक
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -