Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रगंगाघाटावर यजमान पळवण्यावरून पुराेहितांमध्ये तुंबळ भांडण

गंगाघाटावर यजमान पळवण्यावरून पुराेहितांमध्ये तुंबळ भांडण

ताजी बातमी ऑनलाइन टीम

यजमान पळवण्याच्या वादातून आज पंचवटीत गंगाघाटावर पुरोहितांमध्ये तुंबळ भांडण झाले. यामुळे दशक्रिया व इतर विधींसाठी राज्यभरातून आलेल्या नागरिकांची चांगलीच करमणूक झाली.

नाशिक येथे दक्षिण गंगा गोदावरी दक्षिण वाहिनी होते. त्यामुळे पितरांच्या पिंडदानासाठी नाशिकच्या रामघाटाचे मोठे महत्व आहे. यामुळे येथे राज्यभरातून भाविक पूर्वजांच्या पिंडदान विधीसाठी येत असतात. तसेच अस्थिविसर्जनासाठीही हिंदूंच्या दृष्टीने रामघाटाचे मोठे महत्व आहे. येथे रोज हजारोंच्या संख्येने भाविक येत असल्याने त्यांच्यासाठी विधी करण्यासाठी पुरोहितांची वतने ठरलेली आहेत. मात्र, बऱ्याचदा नियम मोडून एकमेकांचे यजमान पळवण्याचे प्रकार घडत असतात. तसाच प्रकार आज सोमवारी (दि.१४) सकाळी दहाच्या सुमारास घडला.

हा प्रकार सामंजस्याने सोडवण्यापेक्षा दोन पुरोहितांमध्ये अर्वाच्च भाषेत एकमेकांना सुनावले गेले. त्यावेळी मोठमोठ्या आवाजात झालेल्या भांडणामुळे गंगाघाटावर विधीसाठी आलेले भाविक तेथे जमा झाले होते. या पुरोहितांचा विधीसाठी झालेल्या वादातून याच लोकांकडून आपल्या पूर्वजांच्या मुक्तीसाठी केलेल्या विधीमुळे त्यांना कशी मुक्ती मिळणार, असा प्रश्न या भाविकांना पडला हाेता.

जवळपास अर्धातास हे भांडण सुरू असल्याने नाशिक या परमपवित्र तीर्थक्षेत्राची बदनामी होते, अशी भावनाही यावेळी व्यक्त होत होती. त्र्यंबकेश्वर येथेही यजमान पळवण्यावरून नेहमीच वाद असताना दोन महिन्यांपूर्वी त्या वादाचे पर्यावसान नाशिक येथे एकमेकांवर धारदार शस्त्र व घातक शस्त्राने वार करण्यापर्यंत मजल गेली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -