ताजी बातमी ऑनलाईन टीम
25 वर्षीय तरुणाचा शिरच्छेद करणाऱ्या टोळीच्या मागावर पोलीस आहेत. मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करताना (Mobile Theft) विरोध केल्यामुळे चोरट्यांच्या टोळीने रविवारी एका तरुणाचा शिरच्छेद केला होता. तामिळनाडूतील (Tamilnadu Crime) तिरुपूरमध्ये हा प्रकार घडला. या टोळीच्या मुसक्या आवळण्यासाठी तिरुपूर पोलिसांनी सोमवारी चार विशेष पथके तयार केली आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पोलिसांना मयत युवकाची ओळख पटली आहे. मयिलादुथुराई येथील कोनाराजापुरममधील रहिवासी असलेल्या एम सतीश याला या घटनेत प्राण गमवावे लागले. तो सेरांगाडू येथील एम्ब्रॉयडरी युनिटमध्ये काम करत होता.
काय आहे प्रकरण?
एम सतीश हा रणजीत नावाच्या मित्रासोबत तिरुपूर येथे एक खोली भाड्याने घेऊन राहत होता. ही जागा त्यांच्या कामाच्या ठिकाणाजवळ होती. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने दोघे रुममेट्स सतीश आणि रणजीत एका खासगी शाळेजवळील रिकाम्या प्लॉटवर दारु पिण्यासाठी गेले.
नेमकं काय घडलं?
ते दारु पीत बसले असताना अचानक तीन मोटारसायकलवरून आलेल्या टोळक्याने दोघांना चाकूचा धाक दाखवला. त्यांनी सतीशचा फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने प्रतिकार केला. त्यामुळे आरोपींनी विळा काढून त्याचा शिरच्छेद केला. इतकंच नाही, तर त्यांनी सतीशचं कापलेले शीर घेऊन तिथून पळ काढला.
रणजीत धावत मुख्य रस्त्यावर पोहोचला आणि तिथून ये-जा करणाऱ्यांची त्याने मदत घेतली. सतीशला उपचारासाठी तिरुपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात नेण्यात आले. रणजीतवरही त्रिचीमध्ये काही गुन्हेगारी स्वरुपाचे आरोप आहेत.
तिरुपूरचे आयुक्त एजी बाबू यांनी चार विशेष पथकांना गुन्हेगारांना अटक करण्याचे आणि मृत व्यक्तीचे कापलेले डोके परत मिळवण्याचे आदेश दिले आहेत.
मोबाईल हिसकावताना विरोध, टोळक्याने 25 वर्षीय तरुणाचं मुंडकं छाटलं
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -