ताजी बातमी ऑनलाइन टीम
केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) अनेक योजना आणत असते. दरम्यान सरकारची असलेली सुकन्या समृद्धी योजनेमध्ये गुंतवणूक (Investment) करणाऱ्यांसाठी एक मोठी माहिती समोर आली आहे. अनेक व्यक्ती आपल्या मुलीचे खाते उघडण्याचा विचार करीत असेल तर याबाबत सविस्तर जाणून घ्या. दरम्यान या योजनेमध्ये अनेक मोठे बदल सरकारने केले आहेत.
या योजनेमध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या मुलीसाठी मोठा निधी (Funding) तयार करू शकणार आहात. देशातील मुलींना शिक्षण अथवा लग्नासाठी निधी सहज मिळू शकेल. यासाठी सरकारकडून ही योजना सुरू करण्यात आली. दरम्यान, या योजनेमध्ये 5 मोठे बदल केले गेले आहेत.
सुकन्या समृद्धी योजनेमध्ये (SSY) पुर्वी एक नियम होता की, मुलगी दहा वर्षांनंतरच हे खाते ऑपरेट करू शकते. मात्र, आता जर तुम्ही तुमच्या मुलीचे खाते ओपन केले तर ती 18 वर्षानंतरच हे खाते ऑपरेट करू शकेल. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत तुम्हाला खात्यामध्ये वार्षिक कमीत कमी 250 रुपये गुंतवणे आवश्यक आहे. तुम्ही ही गुंतवणूक न केल्यास तुमचे खाते डीफॉल्ट मानले जाऊ शकते.
बदललेल्या नियमांनूसार, खाते पुन्हा सक्रिय न केल्यास, मॅच्युरिटी होईपर्यंत, खात्यामध्ये जमा केलेल्या रकमेवर लागू दराने व्याज जमा होत राहील. आधी, डिफॉल्ट खाती पोस्ट ऑफिस बचत खात्यावर लागू असलेल्या दराने व्याज मिळविण्यासाठी वापरली जात होती. दरम्यान त्याचबरोबर याआधी सुकन्या समृद्धी योजनेमध्ये 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळत होता. जर तुम्हाला 2 मुली असतील तर तुम्हाला कर सवलत मिळत होती. परंतु, तिसऱ्या मुलीला हा लाभ मिळत नव्हता.
दरम्यान, सरकारच्या नव्या नियमांनुसार, एका मुलीनंतर 2 जुळ्या मुली जन्माला आल्यास त्या दोघांचे खाते उघडण्याची तरतूद आहे. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत उघडलेली खाती तुम्ही एकतर खातेदाराचा मृत्यू (Died) झाल्यास अथवा मुलीचे निवासस्थान बदलल्यास बंद करू शकणार आहात.
मोदी सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेत 5 मोठे बदल; जाणून घ्या
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -