आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.आता मोठ्या सोबत लहान मुलांना देखील हेल्मेट सक्तीचे केले आहे.
दुचाकीवरून जात असताना चार वर्षाखालील बालकासाठी आता हेल्मेेट आणि सुरक्षा बेल्ट अनिवार्य असणार आहे. केंद्रीय परिवहन आणि रस्ते मंत्रालयाने बुधवारी सुरक्षेचे नवे नियम लागू केले आहेत. तसेच दुचाकीचा ताशी वेग 40 किलोमीटरपर्यंत ठेवण्याची सक्ती करण्यात आली आहे.
सुरक्षेच्या या नव्या नियमांचे उल्लंघन केल्यास एक हजार रुपयांचा दंड आणि तीन महिन्यांसाठी परवाना रद्द केला जाऊ शकतो. दुचाकीवर पाठीमागे बसणार्या बालकाची सुरक्षा निश्चित करण्यासाठी केंद्रीय मोटार वाहन अधिनियमामध्ये बदल करण्यात आले आहेत. नवीन नियमांनुसार सुरक्षा बेल्ट हलका असावा, ज्याचे वजन बालकाला पेलता यावे. त्याचप्रमाणे हेल्मेटची निर्मिती करताना सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक असणार आहे.