Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रडॉक्टर पुत्राचा मर्डर, मृतदेह पेटवून दरीत फेकले; खुनानंतर आनंदोत्सव

डॉक्टर पुत्राचा मर्डर, मृतदेह पेटवून दरीत फेकले; खुनानंतर आनंदोत्सव

नाशिकमध्ये एकामागून एक भयंकर अशी हत्याकांडे होताना दिसत आहेत. आता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सेवानिवृत्त कुलसचिव नानासाहेब कापडणीस (वय 70) आणि त्यांचा डॉक्टर मुलगा अमित कापडणीस (वय 35) या दोघांचा अतिशय क्रूर खून केल्याचे उघड झाल्याने शहर पुन्हा हादरले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी राहुल गौतम जगताप (वय 36) याला बेड्या ठोकल्यात. राहुलने पिता-पुत्राची हत्या करून त्यांचे मृतदेह वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पेटवून दिल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांचा खूनही काही दिवसांपू्र्वी अशाच प्रकारे झालाचे समोर आलेय. त्यांचे पती संदीपने त्यांचा अगोदर खून करून त्यांना जाळल्याचा पोलिसांना संशय आहे. या थरारक हत्याकांडानंतर त्याहूनही थरारक हत्याकांड उघड झाल्याने समृद्ध नाशिकची नेमकी कोणीकडे वाटचाल सुरूय, असा प्रश्न सुजाण नागरिकाला पडल्याशिवाय राहणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -