Monday, December 23, 2024
Homeमनोरंजनअमोल कोल्हे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत

अमोल कोल्हे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत

आजपर्यंत डॉ. अमोल कोल्हेंनी अनेक ऐतिहासिक मालिकेमध्ये काम केल्याचे पाहिले आहे. त्याचबरोबर त्यांच्या मालिकांनी लोकांच्या मनावर देखील राज्य केलं आहे. त्यामुळं त्यांच्या येणा-या नव्या मालिकेची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. कारण त्यांनी पुन्हा एकदा शिवाजी महाराजांची भूमिका साकारली असल्याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यामुळे त्यांनी ही मालिक कशी असेल, याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगू लागली आहे. आत्तापर्यंत अमोल कोल्हे यांनी अनेक मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. तसेच त्यांच्या भूमिका देखील लोकांच्या पसंतीला अधिक उतरल्या आहेत. त्यांनी अनेक चित्रपट देखील केले आहेत. त्याचबरोबर त्यांची राजकीय कारर्कीद सुध्दा यशस्वी झालेली आपण पाहिली आहे. ते सध्या एका पक्षाचे खासदार आहेत.

अमोल कोल्हे यांनी काल एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये ते म्हणतात की योग आला पुन्हा ते गारूड अनुभवण्याचा, पुन्हा नतमस्तक होण्याचा, पुन्हा पडद्यावर “महाराज” साकारण्याचा! असं त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. त्याचबरोबर स्वराज्य सौदामिनी ताराराणी.. सोमवार ते शनिवार ७.३० वाजता सोनी मराठीवर असंही लिहिलं आहे. त्यामुळे अमोल कोल्हे यांच्या चाहत्यांना त्यांची नवी मालिका सोनी मराठी वाहिनीवर सोमवार ते शनिवार सायंकाळी साडेसात वाजता पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अनेक चाहत्यांना आनंद झाला आहे. काल ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर अनेक चाहत्यांनी अमोल कोल्हे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत, तर त्यात आम्हाला काय पाहायला मिळणार आहे, असेही प्रश्न विचारले आहेत. त्यामुळं चाहत्यांना सोनी मराठी वाहिनीवर ही मालिका लवकरचं पाहायला मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -