Sunday, December 22, 2024
Homeक्रीडारोहितने घेतली इशान किशनची शाळा, हात बांधून 15.25 कोटी घेणाऱ्या खेळाडूने गुपचूप...

रोहितने घेतली इशान किशनची शाळा, हात बांधून 15.25 कोटी घेणाऱ्या खेळाडूने गुपचूप सर्व घेतलं ऐकून

भारत आणि वेस्ट इंडिजमधील पहिल्या टी 20 सामन्यात टीम इंडियाने बुधवारी शानदार विजय मिळवला. वेस्ट इंडिजला सहा विकेटने पराभूत करुन मालिकेत 1-0 अशी विजयी आघाडी घेतली. या विजयानंतर कर्णधार रोहित शर्माने सलामीवीर इशान किशनची शाळा घेतली. सामन्यानंतर रोहित इशान किशनसोबत चर्चा करताना दिसला. रोहित बोलत होता, त्यावेळी इशान किशन हात बांधून मान खाली करून सर्व काही गुपचूप ऐकत होता. वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात हा डावखुरा स्फोटक फलंदाज थोडा गोंधळलेला दिसला. त्यामुळे रोहित शर्माने त्याचा क्लास घेतला. इशान किशनने 35 धावा करण्यासाठी 42 चेंडू घेतले. अशी कामगिरी त्याच्याकडून अपेक्षित नाहीय. 83.33 इशान किशनचा स्ट्राइक रेट होता. त्याने चार चौकार लगावले.

इशान किशन या सामन्यात सहजतेने फलंदाजी करताना दिसला नाही. स्ट्राइक रोटेट करतानाही त्याला अडचण येत होती. अपेक्षित फलंदाजी होत नसल्याने अखेर फॅबियन एलेनच्या गोलंदाजीवर खराब फटका खेळून किशन बाद झाला. रोहित शर्माने इशान किशनला त्याचा नैसर्गिक खेळ खेळण्याचा सल्ला दिला. त्याशिवाय त्याने स्ट्राइक रोटेट करण्याचाही सल्ला दिला. जेणेकरुन त्याच्यावर दबाव येणार नाही. इनसाइड स्पोर्टने हे वृत्त दिलं आहे.

“खेळपट्टीवर जाऊन स्ट्राइक रोटेट करण्यावर लक्ष दे. इशानला फक्त थोड्या सामन्यांची आवश्यकता आहे. त्याच्यावर भरपूर दबाव आहे. इशान किशनला कुठलाही दबाव जाणवणार नाही, याची काळजी घेणं, आमचं काम आहे” असं रोहित शर्माने सांगितलं. कालच्या सामन्यात रोहितने धमाकेदार फलंदाजी केली. त्याने 19 चेंडूत 40 धावा फटकावल्या. या उलट इशान किशनने खूप संथ फलंदाजी केली. तो 12 षटकांपर्यंत क्रीझवर होता. पण त्याने फक्त 35 धावा केल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -