महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलिस उपनिरीक्षक पदांच्या नियुक्तीसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एपमीएससीमार्फेत 250 रिक्त जागांसाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मान्यताप्राप्त संस्था/बोर्डाकडून संबंधित विषयातील पदवी असलेले उमेदवार अर्ज करु शकतात.
पात्र असलेले उमेदवार एमपीएससीच्या अधिकृत अधिसूचनेसाठी अर्ज करू शकतात. महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2022 अधिसूचनेमध्ये ऑनलाइन अर्ज , वयोमर्यादा, पगार, MPSC प्रवेशपत्र 2022 इत्यादी बद्दल माहिती दिली आहे. उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
रिक्त पदांचा तपशील –
पोलिस उपनिरीक्षक – 250 पदं
नोकरी वर्ग –
सरकारी नोकऱ्या
महत्वाच्या तारखा –
अर्ज करण्याची प्रक्रिया 14 फेब्रुवारी 2022 पासून सुरु.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2022.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना एमपीएससीची अधिकृत वेबसाइट https://mpsc.gov.in/
पगार –
निवड झालेल्या उमेदवारांना 38,600 ते 1,22,800 पर्यंत पगार मिळेल.
नोकरी ठिकाण –
मुंबई, महाराष्ट्र
पात्रता –
कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था, मंडळ किंवा विद्यापीठातून प्रमाणपत्र / पदवीधर असलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा –
MPSC नोकरी 2022 साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांची कमाल वयोमर्यादा 35 वर्षे आहे.
अर्ज फी –
सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज फी – 544 रुपये.
मागासवर्गीय उमेदवारासाठी अर्ज फी 344 रुपये.