ताजी बातमी ऑनलाइन टीम
टीम इंडियाला नुकताच अंडर-१९ विश्वचषक जिंकून देणारा मराठी खेळाडू वयचोरी प्रकरणात अडकला आहे. वेगवान गोलंदाज राजवर्धन हंगर्गेकर (Rajvardhan Hungergekar) याच्यावर वय कमी केल्याचा गंभीर आरोप झाल्याची चर्चा आहे. मीडिया रिपोर्टस्नुसार, हंगर्गेकरचे खरे वय २१ वर्षे आहे आणि तरीही तो अंडर-१९ वर्ल्डकप खेळला. या स्पर्धेत त्याने अष्टपैलू कामगिरी केली होती.
टीम इंडियाने अंतिम सामन्यात इंग्लंडला हरवून वर्ल्डकप जिंकला. हंगर्गेकरवर वय लपवल्याचा गंभीर आरोप क्रीडा व युवक विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी केला आहे. या आयएएस अधिकार्याने बीसीसीआयला पत्र लिहिले असून त्यात त्यांनी हंगर्गेकर (Rajvardhan Hungergekar) याच्याविरोधात पुरावेही पाठवले आहेत.
एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, ओमप्रकाश बकोरिया यांनी बीसीसीआयला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, उस्मानाबादचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राहुल गुप्ता यांनी राजवर्धन हंगर्गेकरच्या (Rajvardhan Hungergekar) जन्मतारखेची पुष्टी केली आहे. त्यानुसार राजवर्धन हा उस्मानाबाद येथील तेरणा पब्लिक स्कूलचा विद्यार्थी आहे. शाळेच्या नोंदीनुसार, इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतची हंगर्गेकरची जन्मतारीख १० जानेवारी २००१ होती. मात्र, आठवीच्या वर्गात नवीन प्रवेश देताना मुख्याध्यापकांनी राजवर्धनची जन्मतारीख बदलून १० नोव्हेंबर २००२ केली. म्हणजेच १४ जानेवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या अंडर-१९ क्रिकेट विश्वचषकाच्या वेळी राजवर्धन हंगर्गेकरचे वय २१ वर्षे होते.
बीसीसीआयच्या तपासात हंगर्गेकर (Rajvardhan Hungergekar) दोषी आढळल्यास त्याच्यावर बंदी घातली जाऊ शकते. २०१७-१८ मध्ये विश्वचषक जिंकणार्या संघाचा सलामीवीर मनजोत कालराही वयाच्या वादात अडकला होता आणि त्याच्यावर एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती. असे झाले तर हा हंगर्गेकरसाठी मोठा धक्का असेल. एवढेच नाही, तर या खेळाडूचा आयपीएल करारही रद्द होऊ शकतो.
आयपीएल २०२२ च्या लिलावातही हंगर्गेकरला मोठी रक्कम मिळाली आहे. हंगर्गेकरला चेन्नई सुपर किंग्जने दीड कोटी रुपयांना संघात दाखल केले. त्याला विकत घेण्यासाठी मुंबई इंडियन्सनेही बोली लावली, पण शेवटी चेन्नईने बाजी मारली. मात्र, आता या वादानंतर हंगर्गेकरचे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
धोनीच्या CSK ला धक्का! अंडर-१९ क्रिकेटपटू राजवर्धन हंगर्गेकरवर चोरीचा आरोप
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -