ताजी बातमी ऑनलाइन टीम
कबनुर परिसरात दोघा चोरट्यांना नागरिकांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधिन केले. या चोरट्यांकडून चोरीचे काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. कबनुर व परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी सकाळच्या सुमारास कबनूर-कोल्हापूर मार्गावर एका शेतात रस्त्याकडेला संशयीतरित्या मोटरसायकल लावल्याचे एका शेतकऱ्याला आढळले. त्याने सतर्कतेने पाहणी केली असता शेतामधील जलवाहिन्या दोघेजण कट करत असल्याचे आढळून आले.
इतर शेतकऱ्यांना व नागरिकाना जमा करून या दोघाही चोरट्यांना पकडून शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधिन केले. त्यांच्याकडे करवत व अन्य साहित्यही आढळून आले. शिवाजीनगर पोलिसांकडून चोरट्यांची नावे समजु शकली नाहीत.