बॉलिवूडचा सुलतान अर्थात अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफने त्यांच्या आगामी चित्रपट ‘टायगर 3’च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. दिल्लीमध्ये या चित्रपटाची शुटिंग सुरु झाली आहे. एवढी कडक सुरक्षा व्यवस्था असताना सुद्धा सलमानच्या चाहत्यांनी त्यांचे फोटो क्लिक करून सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सलमान खानचे चाहते त्याचा आगामी चित्रपट ‘टायगर 3’ची आतुरतेने वाट पाहत आहेत. याआधीही सलमानने वर्कआउट करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. यामध्ये त्याची जबरदस्त बॉडी दिसत आहे. सलमानच्या या फोटोवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. वयाच्या 56 व्या वर्षी देखील सलमानची अशी बॉडी पाहून नेटिझन्स त्याचे खूप कौतुक करत आहेत.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -