Tuesday, December 24, 2024
Homeब्रेकिंगरेल्वे प्रवाशांना दमदाटी करून लुबाडणारे तिघे गजाआड, सीसीटीव्हीच्या आधारे अटक

रेल्वे प्रवाशांना दमदाटी करून लुबाडणारे तिघे गजाआड, सीसीटीव्हीच्या आधारे अटक

प्रवाशाला दमदाटी करत त्याच्याजवळील मोबाईल हिसकावून पळणाऱ्या तीन चोरट्यांना रेल्वे पोलिसां नी सीसीटीव्ही तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या चोवीस तासात गजाआड केले. शाहिद शेख, सागर म्हात्रे, जयदीप राऊत अशी चोरट्यांची नावे असून शाहिद शेख हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात याआधी देखील चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या तिघांमधील एक जण संधी साधत प्रवाशाला दमदाटी करत त्याचा मोबाईल हिसकवायचा त्यानंतर लक्ष विचलित करण्यासाठी हे तिघे विविध दिशेला पळून जात होते. पोलिसांनी या तिघांकडून आतापर्यंत चोरी केलेले सव्वा लाखांचे मोबाईल हस्तगत केले.

कल्याण रेल्वे स्थानकावर 17 तारखेला रात्री 11 वाजण्याच्या सुमारास एका प्रवाशाला तीन जणांनी दमदाटी करत त्याच्या जवळील महागडा मोबाईल हिसकावून ते तिघे पळून गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात प्रवाशाने तक्रार दाखल केली. रेल्वे पोलिसांनी तात्काळ प्लॅटफॉर्मवरील सीसीटीव्ही तपासले. एका कॅमेरात तिघे चोरटे कैद झाले. या सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीची ओळख पटवली. सीसीटीव्हीत दिसणारा आरोपी शाहिद शेख हा सराईत चोरटा होता. कल्याण रेल्वे पोलीसानी तात्काळ शाहिद याला पत्ता शोधत कल्याण पश्चिमेकडील बैलबाजार परिसरात सापळा रचून अटक केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -